Homeमहाराष्ट्रआतंकवाद भगवा न कभी था, ना है ..और ना रहेगा

आतंकवाद भगवा न कभी था, ना है ..और ना रहेगा

 मुंबई : प्रतिनिधी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा , असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर सरकारने त्यावेळी योग्य पुरावे दिले असते, तर गुन्हेगार सुटले नसते’, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर सर्व सात आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, काँग्रेसच्या यूपीए सरकारवर ‘भगवा दहशतवाद’चा आरोप लावून लक्ष विचलित करण्याचा आरोप केला आहे.

मालेगावमधील भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून पुराव्यांच्या अभावी सर्व ८ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ७ आरोपींचा समावेश होता. याप्रकरणी न्यायालयाने केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. आता याप्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांनी आपली मते व्यक्त केली.

केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या निर्दोष मुक्ततेला काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली चपराक असे म्हटले आहे. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला होता. काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा कट रचला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला. त्यांच्या मते, हा हिंदू समाजाची बदनामी करण्याचा व्यापक कट होता.

निकालास विलंब ही पण शिक्षाच :भुजबळ
छगन भुजबळ यांनी निर्दोष मुक्ततेच्या निकालावर वेगळ्या पद्धतीने भाष्य केले. आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असली तरी, १७ वर्षांनंतर निकाल येत असेल, तर ते शिक्षा भोगल्यासारखेच आहे. यात हिंदू दहशतवाद नावाची कोणतीही गोष्ट नव्हती , असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ म्हणाले.

निकाल असाच लागणार हे अपेक्षितच होते : इम्तियाज जलील
एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्या सरकारने त्यावेळी असे म्हटले का, की बॉम्बस्फोट होऊ द्या आम्ही रस्त्यावर चालणा-या कोणत्याही लोकांना अटक करतो. त्यांनी १५-२० वर्षे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी घालवावी, असा सवाल जलील यांनी केला. हा अत्यंत गंभीर विषय आहे. आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय करते हे पाहावे लागेल. त्यांनी काही केले नाही तर सर्वोच्च न्यायालयाने सुमोटा दाखल करून घ्यावी. मुंबई लोकल बॉम्बस्फोटात जसे राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पोहचले होते. तसेच या प्रकरणातही कोणताही धर्म, जात न पाहता हे प्रकरण सुद्धा राज्य सरकारने रिव् ूसाठी कोर्टात न्यावे अशी मागणी त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR