मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान, आता या अडचणींवर सरकारने तोडगा काढला आहे. आता केवायसी करताना अडचणी येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई केवायसी केले असल्याचेही आदिती तटकरेंनी सांगितले आहे.
आदिती तटकरेंनी सांगितले की, सर्व्हरमध्ये आम्ही सुधारणा आणल्या आहेत. रोजच्या घडीला जवळपास ४ ते ५ लाख महिलांचे ई केवायसी प्रोसेस होत आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी १० लाख महिलांचे केवायसी पूर्ण झाले आहे. जवळपास ४० लाखांपेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रोसेस ९० टक्के झाली आहे. आम्ही दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे. नोव्हेंबरपर्यंत त्यांना केवायसी करण्याचा अवधी आहे. आणखी दीड महिन्याचा कालावधी त्यांच्याकडे आहे. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत अजून १५ दिवसांसाठी वाढवून देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पूरग्रस्त भागातील महिलांना केवायसीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे त्यांना नोव्हेंबरनंतर अजून १५ दिवसात केवायसी करता येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी ई केवायसी केले नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. केवायसी केल्यानंतरच महिलांना १५०० रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करणे अनिवार्य असल्याचेही आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना कोणत्याही परिस्थितीत या दोन महिन्यात केवायसी पूर्ण करावे लागणार आहे.
















