25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeराष्ट्रीयआता वंदे मेट्रो सुरू होणार

आता वंदे मेट्रो सुरू होणार

३ हजार वंदे मेट्रोची योजना, गुजरातला पहिला मान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वंदे भारत ट्रेनच्या अनेक सेवा देशभरात सुरू झाल्या आहेत. वंदे भारत ट्रेनच्या यशस्वीतेनंतर वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनच्या प्रोटाटाईप मॉडेलचे रेल्वेमंत्र्यांनी अनावरण केले. आता लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनही सेवेत हजर होणार आहे. त्यातच आता वंदे भारत मेट्रोही लवकरच सुरू केली जात आहे. वंदे भारत मेट्रोच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन देशाच्या सेवेत येण्यास सज्ज झाली आहे. याचा पहिला मान गुजरातला मिळाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखविणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

वंदे भारत मेट्रो ताशी १३० कि.मी. वेगाने धावणार आहे. परंतु मार्गांनुसार आणि मार्गांच्या क्षमतेनुसार वंदे भारत मेट्रो ट्रेन ७५ ते ९० कि.मी. प्रतितास वेगाने चालवली जाऊ शकते. या ट्रेनमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वंदे भारत ट्रेनप्रमाणेच वंदे भारत मेट्रोही वेगाने पिकअप घेणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने ब्रेक घेत थांबवताही येणार आहे. देशातील पॅसेंजर ट्रेनपेक्षा या वंदे भारत मेट्रोचा वेग अधिक असणार आहे. तसेच देशभरात ३ हजार वंदे भारत मेट्रो सेवा सुरू करण्याचा मानस भारतीय रेल्वेचा आहे.

भुज ते अहमदाबाद
धावणार मेट्रो ट्रेन
पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन भुज ते अहमदाबाददरम्यान धावणार आहे. ही रेल्वे आठवड्यातून ६ दिवस चालवली जाणार आहे. १६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत मेट्रो ट्रेनला हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचा कमीत कमी तिकीट दर ३० रुपये असेल, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR