जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील सोनवळा या छोट्याशा खेडेगावात असलेल्या श्रीमती कांताबाई श्रीहरी नागरगोजे यांचे कार्य आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या मुला प्रती तसेच समाजा प्रती अतिशय वाख्याण्याजोगे आहे.जळकोट तालुक्यामध्ये त्यांना एक आदर्श माता म्हणून संबोधण्यात येते यासोबतच आदर्श राजकारणी तसेच एक आदर्श कुटुंब पालक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते.
समाजात अनेक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने आणि विचारांनी इतरांना प्रेरणा देतात. अशा व्यक्तींच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो. कांताबाई नागरगोजे या अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानल्या जातात. त्यांच्या जीवनकार्यामुळे अनेकांना शिक्षण, समाजसेवा आणि स्त्रीसक्षमीकरणाची प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे कांताबाई नागरगोजे या अनेकांसाठी प्रेरणेचा मूलस्त्रोत ठरल्या आहेत. जळकोट तालुक्यातील सोनवळा या खेडेगावातून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल श्रीहरी गुरुजी यांच्या साथीने केली. श्रीहरी गुरुजी हे आदर्श मुख्याध्यापक होते. ते कर्तव्यपरायण असल्याने त्यांच्या माघारी त्यांनी आपल्या चारही अपत्यांना कर्तृत्ववान बनवून समाजाभिमुख बनवले.
राजकारणामध्ये देखील कांताबाईंना मोठी आवड आहे. जळकोट पंचायत समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यांच्या सभापतीच्या काळामध्ये अतिशय चांगले काम करून जिल्हाभरामध्ये एक आदर्श सभापती म्हणून त्यांना ओळखले गेले. महिला असून देखील सभापती म्हणून त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम केले. त्या तरी राजकारणात होत्याच परंतु आपला मुलगा चंदन पाटील याना देखील राजकारणाचे योग्य धडे दिले.
कांताबाई नागरगोजे यांनी आपल्या आयुष्यात कठोर परिश्रम, जिद्द आणि समाजसेवेची भावना जपली. साध्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांनी नेहमीच समाजातील दुर्बल घटक, विशेषत: महिलांच्या प्रगतीसाठी काम केले. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये शिक्षणाची जाणीव निर्माण झाली. शेवटी असे म्हणता येईल की, कांताबाई नागरगोजे या केवळ एक व्यक्ती नसून त्या प्रेरणेचा एक उज्ज्वल स्त्रोत आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागरूकता, शिक्षण आणि प्रगतीचा मार्ग खुला झाला. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण आणि प्रेरणा समाजात सातत्याने प्रोत्साहन देणारी ठरत
आहे.

