लातूर : प्रतिनिधी
शिक्षणाची पंढरी म्हणून लातूर शहराकडे पाहत असतना गेल्या कांही दिवसापासून या लातूर पॅटर्नला सतत हादरे बसत आहेत. लातूर शहरातील प्रकाशनगर परिसरातील आदर्श कॅम्पसच्या प्राचार्याने अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडछाड करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
संविधान चौकाच्या लगत असलेल्या आदर्श कॅम्पस अ ग्रुप ऑफ इन्सस्टुशन आदर्श इंटरनॅशनल स्कूल मध्ये नर्सरी, एलकेजी, युकेजी, इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे वर्ग चालतात. या शाळेचे प्राचार्य बशीर शेख याने अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनय भंग केल्याची घटना दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शाळेत घडली. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत भारतीय न्याय संहिता नुसार कलम ७४, ७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्राचार्य बशीर शेख याचा पोलिस शोध घेत आहेत.
















