21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रआधी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या!

आधी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या!

मुंबई : प्रतिनिधी
आजारी वडिलांना भेटण्यासाठी पत्नी शिल्पा शेट्टीसोबत लंडनला जाण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणा-या व्यावसायिक राज कुंद्राला उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा हिसका दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने दोघांना परदेशात जायचे असेल तर आधी ६० कोटी रुपये जमा करावेत. अथवा तेवढ्या रकमेची बँक गॅरंटी द्या. त्यानंतरच याचिकेवर विचार केला जाईल, असे स्पष्ट करत याचिकेची सुनावणी एक आठवडा तहकूब ठेवली. कथित ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात न्यायालयाने हे आदेश दिले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी जुहू पोलिस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध व्यापारी दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली.

कुंद्रा याने गुन्हा रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. ती न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याने आजारी वडिलांना लंडन येथे भेटायला जाण्यासाठी परवानगी द्यावी तसेच लुकआऊट नोटीस रद्द करण्यात यावी अशी मागणी करत ऍड. प्रशांत पाटील यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR