26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रआनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली

आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली

अमरावती : प्रतिनिधी
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अशातच आता अमरावतीतून महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी दरम्यान शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना आता रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अमरावती महानगर पालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना अमरावतीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अडसूळ यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे रुग्णालयात पोहोचले होते.

शिवसेना-भाजप पुन्हा जागावाटपाची चर्चा
समोर आलेल्या माहितीनुसार, आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्यात निवडणुकीच्या जागावाटपाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढे आणखी काय वाटाघाटी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR