अहमदपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील हडोळती जवळ असलेल्या आनंदवाडी येथील नाजुद्दीन खुरेशी यांच्या पोल्ट्रीफॉर्ममध्ये त्यांना हा अतिविषारी घोणस साप आढळून आला. त्यांनी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी अंतर्गत काम करीत असलेले सर्पमित्र अमोल शिरूरकर, अशोक कांबळे, सूरज टोकलवाड यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र शिरूरकर ग्रुपची टीम त्या ठिकाणी जाऊन घोणस सापाला सीताफिने पकडले आहे.
घोणस हा साप अतिविषारी असून या सापाचा रंग पिवळा व तपकीरी रंगावर लांबट गोलाच्या शरीराच्या उजवीकडे व डावीकडे आशा तीन माळा डोक्यापासून ते शेवटपर्यंत असतात. लांबी पाच ते सहा फुटा पर्यंत वाढते. या सापाचे भक्ष्य उंदीर, सरडे, घुशी, पाल, पक्षी, व पक्ष्याची अंडी हे असते. या सापाची मादी वीस ते साठ पिल्लांना जन्म देते. हा साप चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढून एक प्रकारे चेतावणी देतो. हा साप अजगर या सापाप्रमाणे जाडजुड असतो. घोणस या सापाचे विष हिमोटॉसिक असते जे अतिजहाल आहे. या सापाने चावा घेतल्यास त्याचा परिणाम मानवी शरीराच्या रक्तावर व लिव्हर होतो. रक्त गोठण्याचे काम हे विष करते.आपल्या परिसरात साप अथवा जखमी पशु-प्राणी आढळून आल्यास त्याला न मारता न घाबरता सर्पमित्र शिरूरकर ग्रुपच्या हेल्पलाईन ७७०९७७९७९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.