रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण
दिवाळीचा सण गोड करण्यासाठी शासनाकडून रेशन दुकानांमार्फत दिल्या जाणा-या ‘आनंदाच्या शिध्या’ची यंदा प्रतीक्षा करणा-या लाभार्थ्यांच्या पदरी यावर्षी निराशा पडली आहे. ही योजना बंद झाल्याने रेणापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यात आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणा-या कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि सणासुदीच्या खर्चामुळे गरीब कुटुंबांना दिवाळी साजरी करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या आनंदाच्या शिध्यामुळे काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळी अगदी काही दिसावर येवुन ठेपली असताना रेशन दुकानांत शिधा उपलब्ध नसल्याने गरीब कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले आहे. शासनाने दिवाळीचा विचार करून लाभार्थ्यांना तातडीने आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गोर गरीब सर्वसामान्य , शेतकरी , नागरीक यांच्याकडून होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आनंदाचा शिधा मिळण्याची अपेक्षा
















