मुंबई : प्रतिनिधी
मराठी बोलण्यास नकार देणा-याला मनसैनिकांनी मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रात मराठी-हिंदी वरुन राजकारण पेटले आहे. हिंदी भाषिक राज्यातील नेते मनसेवर तुटुन पडले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी समाज माध्यमावर मनसेला डिवचणारी पोस्ट शेअर केली आहे. मनसैनिकांना थेट आव्हान दिले आहे.
विशेष म्हणजे दुबे यांनी ही पोस्ट मराठीतून लिहिली आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांनी पोस्ट टॅग केली आहे. मराठीवरुन आक्रमक भूमिका घेणा-यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे कुत्र्याची उपमा दिली. आता मनसे त्यांना काय उत्तर हे लवकरच समजेल. मराठी-हिंदी मुद्दांवरुन त्यांनी वाघ-कुत्रा अशा उपमा वापरल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
हिंदी भाषिकांना मुंबईत मारणा-यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वत:च ठरवा. असे निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.
निशिकांत दुबे हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींनी अडचणीत आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठींना त्यांना समज देणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.