लातूर : प्रतिनिधी
राजकारण व समाजकारणात काम करीत असताना आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा दृष्टिकोन कायम असल्याचे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले. लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने सतीश काळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी १५०० केशर आंब्यांची झाडे वाटप, शेतकरी महिला मेळावा व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘रीड लातूर’च्या संस्थापक सौ. दीपशिखा धिरज देशमुख, कु. दिवियाना देशमुख, चि. वंश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समिती सभापती जगदीश बावणे, मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, माजी जि.प.सदस्य धनंजय देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष संतोष देशमुख, २१ शुगरचे विजय देशमुख, माजी व्हाईस चेअरमन रवी काळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, सपना किसवे, राजकुमार पाटील, कैलास पाटील, लक्ष्मण पाटील, तुकाराम पाटील, श्रीकृष्ण काळे, रणजीत पाटील, अनंत बारबोले, तात्या पालकर, अनिल पाटील, नवनाथ काळे, मदन भिसे, लतिका सुभाष देशमुख, लता रमेश देशमुख, डॉ. बालाजी वाघमारे, डॉ दिनेश नवगिरे, सचिन सूर्यवंशी, अनिता
दीपक काळे, छाया बच्चे साहेब देशमुख, सतीश काळे, प्रशांत देशमुख, कैलास काळे, सुनील पाटील, बबन काळे, रमेश मोरे, मैनोद्दीन सय्यद, भगवान देशमुख, रेखा पिंपरे, रमाकांत आदमाने, वीरसेन भोसले, शंकर घोडके, प्रमोद देशमुख, गणी सय्यद, ज्योतीराम ढोले , हनुमंत काळे, दिलीप शिंदे, पांडुरंग पाटील, जयपाल देशमुख, अमोल देडे, लक्ष्मण शिंदे, भैरवनाथ झाडके, दत्ता शिंदे, चंदू शिंदे, तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आदी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते
माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख व सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी ग्रामपंचायत स्तरावरून कामाची सुरुवात केली व नंतर राज्य व देशाच्या राजकारणात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. हे करीत असताना पद असो – नसो, सत्ता असो अथवा नसो सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रति असलेली आपली जबाबदारी त्यांनी कायमपणाने पार पाडली. तोच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही सारे वाटचाल करीत आहोत. शेतकरी, शेतमजूर, तरुण व समाजातील सर्व घटक हा आमच्या केंद्रस्थानी आहे, असे सांगून बोरगावकरांनी वृक्ष लागवड व संगोपनासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद असून आपला जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
या वेळी धनंजय देशमुख, जगदीश बावणे आदींची समयोचित भाषणे झाली. आपल्या प्रास्ताविकात सोसायटीचे चेअरमन सतीश काळे यांनी आपल्या कार्याचा आढावा देऊन जिल्हा बँकेच्या बहुमुल्य सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या वेळी कु. दिवियाना दीपशिखा धिरज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय सािहत्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक, काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

