लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांची शनिवार दि. १८ जुलै रोजी सकाळी महाराष्ट्र राज्य बेरोजगार-स्वयंरोजगार सहकारी संघ मर्यादित मुंबई शिष्टमंडळाने बाभळगाव निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र राज्य बेरोजगार-स्वयंरोजगार सहकारी संघ मर्यादित मुंबई राज्य अध्यक्ष संतोष बोबडे, उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक सिकंदर पटेल, समीर राजपूत, सचिन कोल्हापुरे, गणेश मोरे, पवनकुमार गायकवाड यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
















