लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २७ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या समजून घेत त्यांच्या निमंत्रनाचा स्वीकार केला, तसेच संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, मनपा सभागृह नेते विजयकुमार साबदे, विलास को-ऑपरेटिव्ह बँक व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी महापौर दीपक सुळ, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विकास कांबळे, अॅड. अतिश चिकटे, अल्लाबक्ष शेख, नारायण कांबळे, सतीश साळुंखे, भालचंद्र सोनकांबळे, सुपर्ण जगताप, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, राहुल पवार, अब्दुल खदीर शेख, सिकंदर पटेल, संजय बावगे, नर्सिंग बुलबुले, वीरभद्रआप्पा कल्याणी, गोविंद कांबळे, किसन सगर, रोहित माने, मालबा घोणसे, मनोज कदम, प्रशांत पाटील, अग्निवेष शिंदे, सुनील बडूरकर, विजयकुमार धुमाळ, सुनील बसपुरे, बंदेनवाज सय्यद, गोविंद देशमुख, सुरज पांचाळ, दत्ता सोमवंशी, बालाजी मुस्कावाड, विठ्ठल पावडे, अक्षय देशमुख, विलास कदम, प्रताप पाटील, राम चामे, अॅड. अंगद गायकवाड आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले यांचे अभिनंदन
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवारी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी सचिन बंडापल्ले यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल सचिन बंडापल्ले यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक युनूस मोमिन, नगरसेवक अॅड. फारूक शेख, नगरसेविका शहनाज गोलंदाज, नगरसेविका अंकिता भडीकर, व्यंकटेश् पुरी, सत्यवान कांबळे, आसिफ गोलंदाज, प्रशांत भडीकर, निजाम शेख, बब्रुवान गायकवाड आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

