23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार

आमदार संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून कोर्टात जनहित याचिका

मुंबई : प्रतिनिधी
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट आणि सीडीआर रिपोर्ट उघड करा अशी मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील रूमच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये तत्कालीन मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले होते. हे प्रकरण भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उचलून धरले होते.

दरम्यान, संजय राठोड हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर भाजपच्या आणि चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची काहीच चर्चा नव्हती मात्र आता ऐन विधानसभेच्या तोंडावर ही सीबीआय चौकशी करणारी जनहित याचिका दाखल केल्यामुळे राठोड यांच्या अडचणी वाढू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR