26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमुख्य बातम्या‘आयएएफ’च्या रॅँकिंगमध्ये वाढ; घसरणीमुळे चीनचा जळफळाट!

‘आयएएफ’च्या रॅँकिंगमध्ये वाढ; घसरणीमुळे चीनचा जळफळाट!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या हवाई दलाने चीनवर मात केली आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एअरक्राफ्टची नुकतीच रँकिंग जाहीर झाली. त्यात इंडियन एअर फोर्स जगातील तिसरं शक्तीशाली हवाई दल ठरलं आहे. चीन भारताच्या मागे चौथ्या स्थानावर आहे. टॉप पोजिशनवर अजूनही अमेरिकेचा दबदबा कायम आहे. त्यानंतर दुस-या नंबरवर रशियन एअरफोर्स आहे. चीनची घसरण चौथ्या स्थानावर झाली आहे. त्याआधी चीन तिस-या नंबरवर होता. चौथ्या नंबरवर भारत होता. आता भारत चीनच्या पुढे निघून गेला आहे.

भारताची हवाई शक्ती वाढणं हे आशिया खंडात सामरिक संतुलनात झालेल्या मोठ्या बदलाचा संकेत आहे. रँकिंगमध्ये १०३ देश आणि १२९ एअर फोर्स आहेत. यात सैन्य, नौदलाचा सुद्धा समावेश आहे. ही रँकिंग देताना जगभरातील ४८,०८२ विमानांचा अभ्यास करण्यात आला.

भारताकडे १,७१६ विमानांचा ताफा आहे. इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यात ३१.६ टक्के फायटर जेट्स, २९ टक्के हेलिकॉप्टर आणि २१.८ टक्के ट्रेनर एअरक्राफ्ट आहेत. इंडियन एअरफोर्स वापरत असलेली उपकरणं अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्रायल सारख्या देशांमध्ये बनवण्यात आलेली आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR