अहमदाबाद : वृत्तसंस्था
आयपीएलच्या १८ व्या हंगामात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये जेतेपदाची लढत रंगणार आहे. ३ जूनला जगातील सर्वांत मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होणार असून, या लढतीत आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील विजेता ठरणार आहे.
पंजाबचे नेतृत्व हे श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सुवर्ण क्षण दाखवून देण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघ पहिल्यांदा जेतेपदासाठी भिडत असले तरी दोन कॅप्टन मात्र दुस-यांदा समोरासमोर येणार आहेत. आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्सची पाटी कोरीच आहे. दोन्ही संघ पहिल्या हंगामापासून स्पर्धेत खेळत आहेत. आता अय्यर प्रीती झिंटाच्या संघाचे चॅम्पियन करण्याचे स्वप्न साकार करणार की, १८ व्या हंगामात रजत पाटीदार हा विराट कोहलीच्या संघाचा दुष्काळ संपविणार, हे पाहावे लागेल.