लातूर : प्रतिनिधी
लातूर नगरीत क्रिकेटमधील आयपीएल स्पर्धेदरम्यान बॅडमिंटन एलबीएल -२ स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेसाठी १२ संघमालक त्यांच्या प्रत्येकी २० खेळाडूंसह मैदानात उतरले होते.
लातूर जिल्ह्यातील त्यात डॉक्टर, अभियंता, विधिज्ञ, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, उद्योगी अशी विविध क्षेत्रातील २४० बॅडमिंटन खेळाडूची निवड होऊन स्पधेत भाग घेतला होता. स्पर्धा या ३०-४०, ४१-५०, ५१-६० व ६०+ या चार वषॅ वयोगटात घेण्यात आल्या. प्रत्येक संघ मालकाकडे वय वषेॅ ३०-४० व ४१-५० या गटाचे प्रत्येकी ७ खेळाडू व ५१-६० व ६०+ या गटाचे प्रत्येकी ३ असे २० खेळाडूंचा संघ होता. १० जानेवारी पासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोप बीएसएफचे आय, जी विनितकुमार शर्मा, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या. हस्ते संपन्न झाला या स्पर्धेला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी मान्यवरांनी हजेरी लावली होती. स्पर्धेसाठी संघमालक व खेळाडूंचा उदंड उत्साह व प्रतिसाद मिळला.
उपांत्य फेरीच्या एका सामन्यात ुब्लास्टर विरुद्ध माहेश्वरी तर दुस-या सामन्यात रामदेव शटल बस्टर विरुद्ध टीम सावली यांच्यात चूरशीच्या लढती झाल्या. इ‘ ब्लास्टर व रामदेव शटल बस्टर हे दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले. अंतिम सामना हा रामदेव शटल बस्टर या संघाने जिंकून सुवर्णं पदकाचा व ५१ हजार रूपये, रनर टिमला ३५ हजाराचे बक्षीस मिळालेह्याशस्वी करण्यासाठी स्पर्धा समितीचे अध्यक्ष सोमाणी आशिष, सचिव गायकवाड बाबुराव, सदस्य लाहोटी आनंद, दुगेशॅ ब्रिजवाशी, बंग आनंद, चांडक श्रीकांत व मालपाणी पवन यांनी नियोजन व कार्यवाही करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले होते.

