लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साखर कारखान्याच्या वतीने शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी कारखाना स्थळी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजीत करण्यात आले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच १५ इनफिल्डरचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दुपारी कारखाना स्थळी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरात आरोग्य तपासणी करुन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर १५ इनफिल्डरचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले. या आरोग्य शिबीरात डॉ. अभिजीत यादव, डॉ. बजरंग खडबडे, डॉ. शंकर साबळे, डॉ. विजय कसबे, डॉ. जावेद तांबोळी डॉ. कैफ काझी, वैद्यकीय अधिकरी डॉ.नंदकीशोर निकते यांनी तपासणी व आरोग्य उपचार केले. यावेळी त्यांना बालाजी कदम, सुनील यादव, काशीनाथ भातमोडे, अतिश मस्के, पंकज किनगावकर, स्वप्नील आव्हाड यांनी मदत केली. या शिबीराचा २०० कर्मचारी यांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील संचालक सर्वश्री अमृत हरिश्चंद्र जाधव, अनंत व्यंकटराव बारबोले, नरसिंग दगडू बुलबुले, गोवर्धन मोहनराव मोरे, रणजित राजेसाहेब पाटील, रसूल दिलदार पटेल, तात्यासाहेब छत्तू पालकर, हणमंत नागनाथराव पवार, रामराव विश्वनाथ साळुंके, दीपक अर्जुन बनसोडे, शाम भारत बरुरे, सुभाष खंडेराव माने, रमेश देशमुख यांच्यासह सभासद, ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांना वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

