20.6 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीयआशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार!

आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार!

बीसीसीआय सचिव सैकियांची नक्वींसोबत चर्चा
दुबई : प्रतिनिधी
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दुबईत आयसीसीच्या बैठकीनंतर पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया कप ट्रॉफीसंदर्भातील वाद दूर करण्यात यशस्वी ठरले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये यावर योग्य मार्ग काढण्यासाठी काम केले जाईल, असे म्हटले.

मोहसीन नक्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असून ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत. याशिवाय नक्वी पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिकेमुळे मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलनही टाळले होते. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले. आशिया कप ट्रॉफीच्या फायलनमध्ये भारताने ५ विकेटने विजय मिळवला होता.

आशियाई ट्रॉफीबाबत चर्चेची प्रक्रिया सुरू होणे चांगले आहे. दोन्ही पक्षांनी आयसीसीच्या बैठकीत सामंजस्याने भाग घेतला. आता यावर लवकरच योग्य मार्ग काढला जाईल. आशिया कपची ट्रॉफी सध्या दुबईतील आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात असून नक्वींनी कर्मचा-यांना त्यांच्या परवानगीशिवाय ट्रॉफी कुठे घेऊन जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. यासंबंधी सैकिया यांनी दोन्ही बोर्ड हा वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी काही तरी करतील, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR