22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeअंतरराष्ट्रीयआशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारताचा पराभव

आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारताचा पराभव

दोहा : वृत्तसंस्था
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. वैभव सूर्यवंशी एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली.

भारताने १९ षटकांत सर्व गडी गमावून १३६ धावा केल्या आणि विजयासाठी १३७ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले आव्हान ८ गडी राखून पूर्ण केले. भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या माझ सदाकत आणि मोहम्मद नईम यांनी आश्वासक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. यानंतर यश ठाकूरच्या गोलंदाजीवर मोहम्मद नईम १४ धावा करून बाद झाला. माझ सदाकतने आक्रमक खेळी भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले. त्याने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. सुयश शर्माने भारताला दुसरे यश मिळवून दिले. दुसरीकडे माझ सदाकत एका बाजूने आक्रमक खेळी करत होता. त्याने पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR