सोलापूर : समाजातील गोर गरीब विद्यार्थीना आपला जीवनात उच्च शिक्षण घेऊन समाजासह देश सेवा करावी असे आवाहन सोलापुर जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यानी केले.
आस्था रोटी बँक आयोजित विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप प्रसंगी प्रमुख अतिथि म्हणुन मार्गदर्शन पर बोलत होते. हा कार्यक्रम तुळजापुर वेसेतील नगरेश्वर मंदिर सभागृत संपन्न झाला. हा उपक्रम सोलापुर चे माजी पोलिस अधीक्षक तथा हैदराबाद चे सीबीआई चे आई जी वीरेश प्रभु व विशेष कार्यकारी अधिकारी तथा वैदिकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा वाढदिवसा निमित्त पार पडला.
या प्रसंगी संस्थचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी, अमित कांबळे, रविंद्र सोमशेट्टी, मीरा देसाई, संस्थापक अध्यक्ष विजय छंचूरे, सुनील शरणार्थी ,महिला अध्यक्ष नीलिमा हीरेमठ, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्कर पुकाळे, सुरेखा पाटील, कांचन हीरेमठ, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनीता तालिकोटि, संगीता छंचुरे आदि पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास विद्यार्थी पालकवर्ग व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन छाया गंगणे यानी केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यानी केले.