35.3 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeक्रीडाइंग्लंडची विजयी हॅट्ट्रिक, न्यूझीलंडला धक्का

इंग्लंडची विजयी हॅट्ट्रिक, न्यूझीलंडला धक्का

सुपर ८ फेरीत सलग तिसरा विजय
कोलंबो : वृत्तसंस्था
युवा फलंदाज रेहान अहमद आणि विल जॅक्स या जोडीने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी टी-२०्र वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत विजयी हॅट्ट्रिक पूर्ण केली. इंग्लंडने न्यूझीलंडवर ४ विकेट्सने मात करत सलग तिसरा विजय मिळवला.

न्यूझीलंड क्रिकेट टीमने इंग्लंडला विजयासाठी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये १६० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने हे आव्हान ४ विकेट्स राखून ३ बॉलआधी पूर्ण केले. इंग्लंडने १९.३ ओव्हरमध्ये १६१ धावा केल्या तर न्यूझीलंडने या पराभवासह उपांत्य फेरीत सुरक्षितपणे पोहोचण्याची मोठी संधी गमावली. न्यूझीलंडच्या पराभवामुळे आता पाकिस्तानचीही सेमी फायनलसाठी शक्यता वाढली आहे.

न्यूझीलंडने टॉस जिंकून ७ विकेट्स गमावून २० ओव्हरमध्ये १५९ धावा केल्या. न्यूझीलंडसाठी टीम सायफर्टने ३५ तर ग्लेन फिलिप्सने ३९ धावांचे योगदान दिले तर इतरांनीही हातभार लावला. त्यामुळे इंग्लंडसमोर १६० धावांचे आव्हान ठेवले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्यानंतर अप्रतिम सुरुवात केली. न्यूझीलंडने पहिल्या २ ओव्हरमध्ये इंग्लंडच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. फिलिप सॉल्टने २ धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला तर जोस बटलर याला भोपळाही फोडता आला नाही. कॅप्टन हॅरी ब्रूकने २६, जेकब बेथलने २१, सॅम करनने २४ तर टॉम बँटनने ३३ धावांचे योगदान दिले. टॉम आऊट झाल्याने इंग्लंडचा स्कोअर १६.५ ओव्हरमध्ये ६ बाद ११७ असा झाला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी १९ बॉलमध्ये ४३ रन्सची गरज होती. त्यावेळी रेहान अहमद आणि विल जॅक्स या जोडीने ३ बॉलआधीच या धावा पूर्ण करुन इंग्लंडला विजयी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR