अहमदनगर : प्रतिनिधी
सध्या इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. लेकीचा शाही पद्धतीने केलेल्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज टीकेचा धनी झाले आहेत. इंदुरीकर यांच्या कीर्तनातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यामध्येच त्यांचा अजून एक प्री- वेडिंग व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये प्री- वेडिंग शूटबद्दल बोलताना दिसत आहेत.
इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा ज्या पद्धतीने साखरपुडा केला, त्यानंतर ते टीकेचे धनी ठरले. पैशांची मोठी उधळण महाराजांनी केली. महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यानंतर वारकरी संप्रदायानेही टीका केली.
इंदुरीकर महाराज कीर्तनामध्ये प्री वेडिंग शूटबद्दल बोलताना दिसत आहेत. इंदुरीकर महाराज म्हणतात की, आता एक बावळटपणा लग्नात आणला. राजकारणी लोक, पैशेवाले लोक आणि महिलांना बारीकपणे ऐका जरा. लग्नात ते एक स्क्रीन आणलंय. त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठे शिकला हे दाखवा. ती मुलगी कुठे शिकली हे दाखवा. त्यांच्या गावातले देवूळ दाखवा..सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवा ता त्या स्क्रीनवर.
त्या पोराने आणि पोरीने लग्न जमवल्यावर कुठे एकांतात नाटकं केले, हे लोकांना दाखवता तुम्ही? त्याने ओढ्याला पळायचे येढ्या बाबळीत मुका घ्यायचा. बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा आणि ते आम्ही बघायचे? त्याला काय म्हणतात प्री वेडिंग. त्या पोरीने पुढे पळायचे आणि त्या पोराने मागे पळायचे आणि त्यांच्या मागे तो कॅमेरामॅन पळणार आता काही गोष्टींसाठी दोघेच जण लागतात, असेही यावेळी त्यांनी म्हटले.
मग त्या पोरीने बोकांडी बसायचे आणि मांजरेचा मुका घ्यायचा कुत्र्याचा मुका घ्यायचा. अर्धाले कपडे घालून वड्याला पळायचं. ते व-हाडी बघतात. हे हसण्यावारी गोष्टी नेऊन का, तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर अशी वागत होती, हे लोकाला दाखवता का तुम्ही? त्याचा कोर्सच निघाला आहे दोन दिवस अगोदर वड्यामध्ये डोंगरांमध्ये पळायचा. व-हाड टाईट बसून पाहत, असेही इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे.

