26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रइंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने वाद

इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने वाद

अहिल्यानगर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यातील थाटमाट आणि त्या कार्यक्रमासाठी लागलेला खर्च यावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली.

दरम्यान, हा वाद मागे पडत असतानाच आता इंदुरीकर महाराज यांच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाची चर्चा होत आहे. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन चालू असतानाच तिथे एका वाहतूक पोलिस अधिका-याने एन्ट्री केली. त्यामुळे कीर्तन काही काळासाठी थांबवावे लागले. त्यानंतर तिथे काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हीडीओही तेव्हा चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. इंदुरीकर महाराज यांनी मात्र मी लग्न यापेक्षा मोठे करणार आहे, असे सांगून टीकाकारांना उत्तर दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार १२ डिसेंबर रोजी पुण्यातील काळेपडळ परिसरात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. हे कीर्तन ऐकण्यासाठी नेहमीप्रमाणे शेकडो लोकांनी गर्दी केली होती. मात्र इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनादरम्यान त्या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिणामी वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण पडला. लोक रस्त्यावर उभे राहून इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकू लागले. दुसरीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हीच बाब लक्षात घेऊन एका वाहतूक पोलिस अधिका-याने मंचावर जाऊन माईक घेऊन लोकांना आवाहन केले. यावेळी काही काळासाठी इंदुरीकर महाराजांना कीर्तन थांबवावे लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR