31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeक्रीडाइन्स्टावर कोहलीचे कमबॅक!

इन्स्टावर कोहलीचे कमबॅक!

मुंबई : प्रतिनिधी
गुरुवारी मध्यरात्री सोशल मीडिया उघडताच विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. रात्रीच्या वेळी विराट कोहलीचे इन्स्टा अकाऊंट दिसत नसल्याने चाहते संभ्रमात पडले होते. क्रिकेटच्या मैदानानंतर विराटने सोशल मीडियालाही रामराम म्हटले का असा प्रश्न पडला होता. मात्र शुक्रवारी सकाळी कोहलीचे अकाऊंट पुन्हा दिसू लागल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गुरुवारी रात्री अचानक गायब झालेले विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा एकदा दिसू लागले आहे. कोहलीने त्याचे अकाऊंट डिलीट केले का अशी चाहत्यांना काळजी वाटत होती. इन्स्टाग्रामवर कोहलीचे २७४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर तो स्वत: २८३ अकाऊंट्सना फॉलो करतो.

नव्या वर्षाच्या निमित्ताने विराट कोहलीने अनुष्का शर्मासोबत दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर न्यूझिलंडविरुद्धच्या वनडे सिरीजच्या प्रॅक्टिसबाबतही त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. कोहली नेहमीप्रमाणे इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असल्याने चाहतेही आनंदात असतात. मात्र गुरुवारी त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट दिसत नसल्याने सर्वांनाच धक्का बसला. चाहत्यांनी प्रत्येक प्रयत्न करून ते शोधले मात्र सापडले नाही.

मात्र सकाळी विराट कोहलीचे अकाऊंट पुन्हा दिसू लागले. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, विराट कोहलीने स्वत: त्याचे अकाऊंट डीऍक्टिव्हेट केलेले नव्हते. हे कदाचित टेक्निकल ग्लिचमुळे झाले असावे, असे म्हटले जात आहे. विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहतो. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो टीम इंडियासाठी फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळतो. या महिन्याच्या सुरुवातीला तो न्यूझिलंडविरुद्धच्या वनडे सिरीजसाठी भारतात आला होता. सिरीज संपल्यानंतर तो पुन्हा लंडनला परतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR