24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeअंतरराष्ट्रीयइराणमधील मृतांची संख्या  ५५०; अटकेत १०,६००

इराणमधील मृतांची संख्या  ५५०; अटकेत १०,६००

तेहरान : वृत्तसंस्था
इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सरकारविरोधी निदर्शने सुरू आहेत. आतापर्यंत ५५० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १०,६०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. एपी वृत्तसंस्थेने निदर्शकांचा हवाला देत म्हटले आहे की मृतांमध्ये ५०० निदर्शक आणि ५० सुरक्षा कर्मचारी आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, इराणने अमेरिकेशी संपर्क साधून चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन तेहरानसोबत बैठक निश्चित करण्याबाबत चर्चा करत आहे. तथापि, त्यांनी असेही म्हटले की, इराणमधील परिस्थिती पाहता त्यांना आधी कारवाई करावी लागू शकते, कारण मृतांची संख्या वाढत आहे आणि अटकसत्र सुरू आहे.
इराणमधील निदर्शनांदरम्यान भारतीय नागरिकांच्या अटकेच्या बातम्या इराणने फेटाळून लावल्या आहेत. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर फिरणारी ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायल इराणमध्ये दंगे भडकवून अराजकता आणि अव्यवस्था पसरवू इच्छितात. इराणी लोकांना दंगलखोर आणि दहशतवाद्यांपासून दूर राहण्यास त्यांनी सांगितले.  लंडनमध्येही इराणी दूतावासाबाहेर निदर्शने झाली. यावेळी एका आंदोलकाने इराणी दूतावासाचा इस्लामिक प्रजासत्ताकाचा झेंडा काढून १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी वापरला जाणारा झेंडा फडकवला.
इराणचा अमेरिकेला इशारा
इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी तातडीच्या बैठकीत सांगितले की, इराण सध्या इस्रायल आणि अमेरिकेशी थेट संघर्ष करत नाही तर आर्थिक, मानसिक आणि लष्करी-दहशतवादी संघर्षांनाही तोंड देत आहे. अमेरिकेला इशारा देताना गालिबाफ म्हणाले की, ‘जर अमेरिकेने इराणवर लष्करी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. अशा परिस्थितीत इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी आणि नौदल तळांवर इराण हल्ला करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR