25.4 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइस्रायल-लेबनान सीमेवर ६०० भारतीय सैनिक तैनात

इस्रायल-लेबनान सीमेवर ६०० भारतीय सैनिक तैनात

 

बैरुत : वृत्तसंस्था
हिज्बुल्लाह-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या या संघर्षाशी भारताचा काही थेट संबंध नाही. पण इस्रायल-लेबनॉन सीमेवर भारतीय सेनादलातील ६०० जवान तैनात करण्यात आले आहेत.

युनायटेड नेशन्सच्या इंटरिम फोर्स अंतर्गत भारतीय जवान तैनात करण्यात आले आहेत. ब्लू लाइनवर शांतता कायम ठेवणे हा या जवानांचा उद्देश आहे. पण इस्रायल आणि लेबनान त्यांना तिथे शांतता प्रस्थापित करु देत नाहीत. इस्रायल आणि लेबनानमध्ये १२० किलोमीटर लांब सीमा आहे. त्याला ब्लू लाइन म्हणतात.

भारतीय सैन्य आणि सरकारची ब्लू लाइनवर आता थेट नजर आहे. भारतीय जवान तिथे तैनात असल्यामुळे प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. संयुक्त राष्ट्राने वर्ष २००० मध्ये ‘युएनएफआयएल’ची स्थापना केली. ब्लू लाइनवर दोन्ही देशांमध्ये चिथावणीखोर, संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये हा उद्देश आहे. या सीमेवर ‘युएनएफआयएल’चे सैन्य तैनात असते. अन्य देशांचे जवान सुद्धा यामध्ये असतात. खरंतर ब्लू लाइन फक्त सीमा नाही, एक बफर झोन आहे. बफर झोनमध्ये यूएनच्या शांती सैन्याचे पेट्रोलिंग सुरु असते. दशकांपासून भारतीय जवान या सीमेवर तैनात आहेत.

इस्रायलने मागच्या आठवड्यात मंगळवारी लेबनानमध्ये आधी पेजर ब्लास्ट नंतर वॉकी-टॉकीचे स्फोट घडविले. त्यानंतर हा संघर्ष अधिक चिघळला. इस्रायलने त्यानंतर एअर स्ट्राइक करुन काही दहशतवाद्यांना संपवले. हिज्बुल्लाह सुद्धा रॉकेट हल्ल्याने उत्तर देत आहे. दक्षिण लेबनान हा हिज्बुल्लाहचा प्रमुख तळ आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR