22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeलातूरईव्हीएम यंत्र चाचणी प्रक्रियेस मनपा आयुक्ताची भेट

ईव्हीएम यंत्र चाचणी प्रक्रियेस मनपा आयुक्ताची भेट

लातूर : प्रतिनिधी
मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी सुरु आहे. त्यासाठी सुरु असणा-या मतदान यंत्र प्रात्यक्षिकास मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी भेट दिली. निवडणुकीसाठी कर्मचा-यांना मतदान यंत्र हाताळनी व मार्गदर्शनासाठी ४२ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत यंत्राची चाचणी घेण्यात आली. महिला तंत्रनिकेतन येथे ही चाचणी घेण्यात आली.  यावेळी आयुक्त श्रीमती मानसी यांनी सर्व मास्टर ट्रेनर, प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. निवडणुकी संदर्भात विविध विषयावर त्यांनी चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, प्रवीण इंगळे, कसगवडे, परमेश्वर होके व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR