लातूर : प्रतिनिधी
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आजचा योग चांगला आहे. तुमच्यामुळे मला श्रीकृष्णाची आराधना करण्याचा योग आला. आपणा सर्वांना ईश्वर सुख-समृध्दी देवो, अशी भावना विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली.
इस्कॉन मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करून पूजा करण्यात आली त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी अमेरीकेचे अखीलधर प्रभू, लातूर इस्कॉनचे अध्यक्ष धर्मराज प्रभू, शांतीपुराचार्य प्रभू, सदाचारी प्रभू, भिष्म स्तुती माताजी, संगीता मोळवणे, २१ शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, जि. प. माजी सदस्य सोनाली थोरमोटे, रमेश थोरमोटे, गणेश जगताप, राहुल देशमुख, सुखदेव थोरमोटे, व्यंकूराम थोरमोटे, नटवर गोपाल प्रभू आदी उपस्थित होते. इस्कॉन मंदिर येथे जन्माष्टमीनिमित्त शनिवारी मंगल आरती, भागवत, श्रीकृष्णाचा अभिषेक, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद असा कार्यक्रम पार पडला तर रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी प्रभूपाद, अवीरभाव, कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद असे कार्यक्रम दिवसभरात पार पडणार असल्याचे शांतीपुराचार्य प्रभू यांनी सांगीतले.

