उत्तरपत्रिका थेट मोबाईलवर; सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून सीबीएसईच्या परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट ‘डिजीलॉकर’ द्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोर्डाच्या अधिका-यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. यासोबतच, बोर्डाने आपल्या ‘ओएसएम’ प्रणालीच्या अंमलबजावणीचे आणि तेलंगणास्थित ‘कोएम्प्ट एज्यु टेक’ या कंपनीला कंत्राट देण्याच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन केले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कोएम्प्ट कंपनीच्या तेलंगणातील पूर्वीच्या कामावर आणि कायदेशीर आव्हानांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या आरोपांना उत्तर देताना अधिका-यांनी सांगितले की, संबंधित कायदेशीर प्रकरणांची न्यायालयांनी सखोल तपासणी केली असून, त्यात ‘काहीही असामान्य’ आढळलेले नाही. सीबीएसईने ५ डिसेंबर २०२५ रोजी हे कंत्राट कोएम्प्ट कंपनीला दिले होते. या निर्णयाच्या केवळ ६६ दिवसांनंतर, म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी या प्रणालीची पूर्ण-प्रमाणात अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवत्ता आणि खर्चावर आधारित निविदा प्रक्रियेद्वारे ही निवड झाली. या प्रक्रियेत तांत्रिक मापदंडांना ७० टक्के आणि आर्थिक निविदांना ३० टक्के महत्त्व होते. कोएम्प्ट कंपनीने करांसहित प्रति उत्तरपत्रिका अंदाजे २५.७५ असा दर दिला. टीसीएसने तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या दुस-या कंपनीने काही प्रवर्गांसाठी करानंतर प्रति प्रत तब्बल ६५ चा दर दिला होता, जो खूप जास्त होता. कोएम्प्ट ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली. कंत्राट दिले गेले तेव्हा दोन्ही कंपन्यांकडे ‘उटटक लेव्हल ५’ हे सर्वोच्च दर्जाचे प्रमाणपत्र होते.

तांत्रिक त्रुटींवर बोर्डाची भूमिका
प्रणालीमध्ये उत्तरपत्रिका जुळत नसल्याची सुमारे २० प्रकरणे समोर आली आहेत. यावर बोलताना अधिकारी म्हणाले, ‘‘जवळपास ९८ लाख उत्तरपुस्तिकांच्या मूल्यांकनाची ही अवाढव्य मोहीम होती. अशा प्रकारच्या मानवी चुका जुन्या मॅन्युअल पद्धतीतही होऊ शकतात. तरीही, ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण पुरेसे नाही, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून प्रणाली पूर्णपणे दोषमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’

नियम मोडल्यास कंपनीला मोठा दंड
उत्तरपत्रिकांमधील त्रुटींसाठी कंपनीवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक चुकीच्या पद्धतीने स्कॅन केलेल्या किंवा जुळत नसलेल्या उत्तरपत्रिकेसाठी ४,००० रुपये दंड तर अर्धवट स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी ८,००० रुपये दंड आणि पूर्णपणे स्कॅन न केलेल्या उत्तरपत्रिकेसाठी १५,००० रुपये दंड याप्रमाणे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर करारातील अटींनुसार दंड आकारला जाईल. या नवीन डिजिटल व्यवस्थेमुळे पारदर्शकता वाढणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका मिळवणे अधिक सोपे होईल अशी अपेक्षा आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news