पोंगयांग : वृत्तसंस्था
उत्तर कोरियातील हुकूमशाह किम जोंग उन त्यांच्या अजब-गजब निर्णयांसाठी ब-याचदा चर्चेत येतात. आता किम जोंग उन यांनी आईस्क्रीम या शब्दावर बंदी आणली आहे. आईस्क्रीम नावामधून परदेशी प्रभाव दिसून येतो असं किम जोंग उन यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यापुढे एसीयुकिमो अथवा इयूरियुंबोसेउंगी हा शब्द वापरला जाईल. या शब्दांचा अर्थ बर्फापासून बनलेली मिठाई असा होतो.
किम जोंग उन यांना दक्षिण कोरियाई आणि पाश्चात्य शब्द देशातून हटवायचे आहेत. जर परदेशातून कुणी इथं आले तर त्याचा प्रभाव उत्तर कोरियात पडायला नको, त्याऐवजी इथून काही ते शिकून गेले पाहिजे असं किम यांना वाटते. त्यासाठी टूरिस्ट गाइड्ससाठी एक ट्रेनिंग केंद्रही उघडले जाणार आहे. काही इंग्रजी शब्दांचा वापर बंद करून त्याऐवजी पर्यटकांना उत्तर कोरिया शब्द शिकवले जाणार आहेत.
एसीयुकिमो शब्द आर्किटीक क्षेत्रात राहणा-या लोकांकडून घेतला आहे. अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड आणि सर्बियासारख्या बर्फाळ प्रदेशात राहणा-या लोकांना एस्किमो नावाने ओळखले जाते. एस्किमो नावही वादाचे कारण बनले आहे. सांस्कृतिक ओळखीबाबत विविध समुदायातील लोक वेगवेगळे नाव पसंत करतात. तर किम जोंग उन केवळ ड्रामा करत आहेत. ज्या नवीन शब्दाचा वापर करण्याची ते भाषा करतात, तो शब्दही इंग्रजी भाषेतून आला आहे असं एका भाषा तज्ज्ञाने म्हटलं.
















