उदंचन जलविद्युत प्रकल्पांतील वीजनिर्मितीतून राज्य ऊर्जासंपन्न बनवा

मुंबई : राज्य ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जानिर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जासंपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा ऍक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जानिर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यापुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात जलसंपदा विभागसोबत नऊ साईटसाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले, उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण व अद्ययावत तंत्रज्ञान आहे. या जलविद्युत प्रकल्पांव्दारे शेती, उद्योग व व्यावसायिक क्षेत्रासाठी विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच शाश्वत आणि हरित ऊर्जानिर्मिती होणार असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल. राज्याच्या एकूण ऊर्जानिर्मिती क्षमतेच्या ५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करण्याच्या शासनाचा मानस असून त्यादृष्टीने नियोजन व काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आज झालेल्या सामंजस्य करारामुळे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात ८ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून ९ हजार २०० इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.

जलसंपदा विभाग आणि महाजेनको यांच्यासोबतच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ३१४५ मेगावॅट क्षमतेच्या, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत २११० मेगावॅट क्षमतेच्या तर अवादा ऍक्वा बॅटरीज यांच्यासोबतच्या ३६५० मेगावॅट क्षमतेच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्ष-या करण्यात आल्या.

महाजेनकोमार्फत घाटघर येथे १२५ मेगावॅट, कोडाळी येथे २२० मेगावॅट, वरसगाव येथे १२०० मेगावॅट आणि पानशेत येथे १६०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत मुदखेड येथे ११० मेगावॅट, निवे येथे १२०० मेगावॅट आणि वरंढघाट येथे ८०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तर अवादा ऍक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना कल्याण येथे २४०० मेगावॅट आणि सिरसाळा येथे १२५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारप्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर आणि अभय हरणे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news