21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करणा-या पथकाचा निवडणूक आयोगाकडून सन्मान

उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करणा-या पथकाचा निवडणूक आयोगाकडून सन्मान

यवतमाळ : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे वणी येथे आले असता त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगची तपासणी करण्यात आली. या केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सामान्य निरीक्षक सज्जन राजसेकर (आयएएस) यांनी कौतुक केले असून अभिनंदन करून प्रमाणपत्र दिले आहे.

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देरकर निवडणूक लढवत आहेत.

या मतदारसंघात दाखल होताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी केली होती. उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हीडीओ करत भरारी पथकाच्या प्रतिनिधींना काही प्रश्न देखील विचारले होते. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.

यानंतर आज निवडणूक आयोगाने भरारी पथकातील सदस्यांचे कौतुक केले आहे. या पथकामध्ये भरारी प्रथक प्रमुख नितीन बांगडे, भरारी पथक सहायक अमोल गाठे, पोलिस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम डडमल आणि पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांचा समावेश होता. तपासणीदरम्यान नि:पक्षपातीपणा राखून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले, पारदर्शकतेच्या तत्त्वांना बळकटी दिली त्यामुळे निवडणूक आयोगाची ही उच्च मानके प्रतिबिंबित झाली असे प्रमाणपत्र दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR