Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या सर्व शिलेदारांनी घेतली राज्यपालांची भेट

उद्धव ठाकरेंच्या सर्व शिलेदारांनी घेतली राज्यपालांची भेट

कृषी मंत्री कोकाटे, सावली बार चालवणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात निवेदन

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. नुकतेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले आहे. हे अधिवेशन विधेयक कामे आणि निर्णायमुळे न गाजता राजकीय नेत्यांच्या प्रतापांमुळे गाजले आहे. राज्यातील राजकीय अनेक राजकीय नेत्यांचे भांडणे, घोटाळे आणि मारहाण समोर आली आहे. याविरोधात आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. सकाळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, नितीन नांदगावकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या शिलेंदारांनी राज्यपालांची अचानक भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील वाचाळवीर मंत्री आणि कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घेण्याबाबत त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

या भेटीची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. अंबादास दानवे यांनी लिहिले आहे की, ‘सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळांने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंर्त्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाबद्दल माहिती पत्राद्वारे दिली. मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे , राज्य मंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती स्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडली,’ अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.

ते म्हणाले की योगेश कदम यांच्या आईचे नाव आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये २२ बार गर्ल पकडल्या गेल्या. राज्याचा गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतो. मुख्यमंत्री गृहमंत्री झोपलेत का? अशी विचारणा अंबादास दानवे यांनी केली. ते म्हणाले की आम्ही महायुतीच्या मंर्त्यांची तक्रार केली आहे. लोकशाहीच्या मंदिरामध्ये यांचे मंत्री रमी खेळतात असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की आमदार वेटरला मारतात त्याचबरोबर गैरवर्धन करतात. छावा संघटनेच्या अध्यक्षांना मारहाण होते. हे सर्व सत्ताधारी करत असताना सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केला.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा भाईंदर महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार अशा अनेक प्रकरण संदर्भात राज्यपाल यांना पत्राद्वारे माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुष्माताई अंधारे, सुप्रदाताई फातप्रेकर, विशाखाताई राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, नितीन देशमुख, अनंत नर व महेश सावंत उपस्थित होते, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR