विधान परिषदेत निरोप समारंभात मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात राजकारणाची कमी आहे, त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. कोणताही निर्णय घेताना ते परिणामांची चिंता करत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुल देशपांडे यांच्यानंतर जर कुणी कोट्याधीश म्हणावे तर मी ते उद्धव ठाकरे यांना म्हणेन, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली. विधान परिषदेतील नऊ सदस्य हे निवृत्त होत असून त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यांच्या निरोपाच्या भाषणावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
उद्धवजी यांचा निरोप समारंभ करत आहोत. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतो. त्याच्यापलीकडे देखील एक नात असते. उद्धवजी यांच्यासोबत अनेक वर्षे आम्ही राहिलो आहोत. उद्धवजी यांचा स्वभाव आहे,त्यात राजकारण कमी आहे. त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. त्यामुळे ते अनेकवेळा निर्णय घेतात, त्यामुळे वेगळी परिस्थिती निर्माण होते. बाळासाहेब ठाकरे यांचादेखील तसा स्वभाव होता. एकदा निर्णय ठरला की तो घेऊन टाकायचा. परिणामांचा विचार नाही.
सर्वसामान्यांना राजकीय
चेहरा देण्याचे काम
राजकारणात ते लवकर आले, पण २०१० नंतर आमची जास्त जवळीक आली. मैत्रीची भावना आमच्यात त्यावेळी निर्माण झाली. आताही आहे. मात्र राजकीय भूमिका आता आमच्या वेगळ््या झाल्या. त्यांनी एखादा निर्णय घेताना कधीही परिणामाचा विचार केला नाही. ज्याला राजकीय चेहरा नाही अशा सर्वसामान्यांना राजकीय चेहरा देण्याचे काम त्यांनी केले.
शिंदेंकडून ठाकरेंचा
साहेब असा उल्लेख
मुंबई : शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र विधान परिषदेत आज उद्धव ठाकरे यांना निरोप देण्याच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच साहेब असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतील आमदार म्हणून हे शेवटचे अधिवेशन आहे. त्या निमित्ताने निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे प्रेम थोड्या
लोकांच्या नशिबात
मुख्यमंत्रिपदानंतर मंत्रालयात प्रवेश केला होता, तो दिवस आठवतो. सर्वांच्या चेह-यांवर आनंद होता. तो क्षण विसरू शकत नाही. मी वर्षा सोडून बाहेर पडलो तेव्हा हेलावलेला महाराष्ट्र बघून मी गहिवरुन गेलो होतो. हे सगळे प्रेम महाराष्ट्राने दिले, असे प्रेम थोड्या लोकांच्या नशिबात येते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

