उद्या ‘प्रशासकीय वाटसरू डॉ. दिगंबर नेटके सन्मानग्रंथ’ प्रकाशन

लातूर : प्रतिनिधी
प्रशासकीय वाटसरू-डॉ. दिगंबर नेटके सन्मान ग्रंथ, संपादक मंडळ व नेटके परिवार, तपसे चिंचोली आणि समन्वय समिती, लातूर यांच्या वतीने मंगळवार दि. २८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता दयानंद शिक्षण संस्थेचे सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे प्रशासकीय वाटसरू-डॉ. दिगंबर नेटके सन्मान ग्रंथ प्रकाशन आणि गुरुगौरव सोहळा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली व नांदेड विद्यापिठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, माजी कुलगुरू डॉ. मधुकर गायकवाड यांच्या हस्ते संपन्न होणार आहे
या सन्मान ग्रंथ प्रकाशन समारंभ प्रसंगी गुरु गौरव सोहळयाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये डॉ. दिगंबर नेटके यांच्या मातोश्री तथा प्रथम गुरू शेषाबाई मालोजी नेटके, डॉ. दिगंबर नेटके यांना  प्राथमिक, माध्यमिक शाळेत तसेच महाविद्यालयीन जीवनात शिकविलेले त्यांचे गुरु माधवराव गणपतराव सूर्यवंशी, हनुमंत कदम (गुरुजी), प्राचार्य गुरुलिंगअप्पा औटी, माजी प्राचार्य रावसाहेब कावळे, वसंत पिराजी गाडीवाले यांना याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे
डॉ. नेटके यांनी  महाराष्ट्रातील जवळपास अर्ध्या विद्यापीठांमधील परीक्षा विभाग अतिशय नीटनेटकेपणे सांभाळत असताना त्यांना प्रशासकीय कामात मदत करणारे प्रशासकीय गुरु त्यांचाही गुरु गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये साहित्यिक माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (मरणोत्तर), नांदेड येथील परीक्षा नियंत्रक डॉ. शांतिनाथ बनसोडे, कुलसचिव, प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे, प्राचार्य डॉ. विजय भोसले, संचालक डॉ. रमेश दापके, प्राचार्य डॉ. आत्माराम पळणीटकर यांना प्रशासकीय वाटसरू पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
साहित्य, कला, कृषी आणि समाज जीवनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये नांदेड विद्यापिठातील भाषा व वाड्मय संकुलाचे विभाग प्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख यांना साहित्य भूषण पुरस्कार, मराठवाडा संगीत कला अकादमी, लातूरचे अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगावकर यांना कलाभूषण पुरस्कार, सावित्रीबाई फुले, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संचालक डॉ. दिवाकर माणिकराव कुलकर्णी, संचालक डॉ. बळीराम नामदेवराव गायकवाड, प्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, डॉ. भूषणकुमार कजरुजी मगरे, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. संजय किसनराव भालेराव यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर तपसे चिंचोली ता. औसा येथील कृषी मित्र अ‍ॅड. वसंतराव पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  प्रशासकीय वाटसरू डॉक्टर दिगंबर नेटके सन्मान ग्रंथ प्रकाशन आणि गुरू गौरव सोहळा समितीच्या वतीने  कार्यक्रमाला  उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news