उपवासासाठीचे पदार्थ महागले ; गृहिणींचे बजेट कोलमडले!

पुणे : प्रतिनिधी
आषाढी एकादशीपासून सुरू होणारा उपवासाचा काळ आता आगामी श्रावण महिन्यापर्यंत अखंड सुरू राहणार आहे. मात्र, यंदा उपवास करणे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलेच कात्री लावणारे ठरणार आहे. साबुदाण्यासह शेंगदाणे, इतर उपवासाच्या पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे.

उपवासासाठी लागणारे पदार्थ साबुदाणा, शेंगदाण्याचे दर वाढले असून गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
आषाढी एकादशीपासून सुरू होणारा उपवासाचा काळ आता आगामी श्रावण महिन्यापर्यंत अखंड सुरू राहणार आहे. मात्र, यंदा उपवास करणे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलेच कात्री लावणारे ठरणार आहे. साबुदाण्यासह शेंगदाणे, इतर उपवासाच्या पदार्थांमध्ये वाढ झाली आहे.

बाजारात उपवासासाठी लागणा-या बहुतांश अन्नधान्य, फळे आणि फराळाच्या पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे गेल्या काही दिवसांत आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात सर्वच उपवासाच्या साहित्याने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे भाविकांना आता उपवासासाठीही पोटाला चिमटा घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

साबुदाणा दरात १० ते १५ रुपयांनी वाढ
उपवासाचा मुख्य आधार असलेला साबुदाणा आणि शेंगदाणा यांचे दरही तेजीत आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत साबुदाणा किलोमागे १० ते १५ रुपयांनी महागला आहे, तर चांगल्या दर्जाचा शेंगदाणाही १७५ रुपये किलो आहे. श्रावण संपेपर्यंत दरांमधील ही तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.

आषाढी एकादशीनंतर श्रावणाचेही उपवास
आषाढी एकादशीला सुरू झालेला उपवासाचा हंगाम पुढील महिनाभर चालणा-या श्रावणात अधिक गडद होणार आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, संकष्ट चतुर्थी यांमुळे उपवास करणा-यांची संख्या मोठी असते. मात्र, यंदा श्रावण सुरू होण्यापूर्वीच बाजारात महागाईची झळ जाणवू लागली आहे.

फळांचे भावही गगनाला
उपवासाला फलाहार करणा-यांनाही महागाईचा फटका बसत आहे. सफरचंद, डाळिंब, आणि केळीच्या भावात २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. सफरचंद थेट दोनशे पार गेले असून, आवक कमी असल्याने केळी डझनमागे १० ते २० रुपयांनी महागली आहेत.

तेल-तूपही महागले
उपवासाचे पदार्थ तळण्यासाठी लागणारे शेंगदाणा तेल आणि पॅकबंद तुपाचे दरही स्थिर नसून त्यात किंचित वाढ झाली आहे. शेंगदाणा तेल १७५ ते १९० रुपये लिटर, तर ब्रँडेड तूप ६५० ते ७५० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news