उमरी : प्रतिनिधी
थोड्या काळाच्या विश्रांतीनंतर बाप्पाच्या आगमनासोबतच वरुण राजाने देखील मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. आज (दि.२८) सकाळपासूनच उमरी शहर व तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. भोकर भागात जोरदार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे.
कामारेड्डी भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अंतरराज्य लेंडी धरणात ८९.५० मिमी पाणी साठले आहे. बुडितक्षेत्रातील हसनाळ व रावणगाव पाण्याने वेढले गेले आहेत. मुखेड तालुक्यातील चांडोळा, येवती, मुखेड, जांब, बा-हाळी, मुक्रमाबाद, अंबुलग् आणि जाहुर अशी आठ मंडळांना पावसाचा फटका बसलेला आहे.
















