26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeलातूरउमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

लातूर : प्रतिनिधी
राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दि. १५ डिसेंबर रोजी जाहीर केला. त्यानंतर लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. आज दि. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. दि. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी श्रीमती मानसी यांनी ६ निवडणुक निर्णय अधिका-यांची निवड केली आहे. प्रत्येक निवडणुक निर्णय अधिका-यांसाठी स्वतंत्र कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आर. ओ. कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार प्रभाग क्रमांक १, २, ३ साठी निवडणुक निर्णय अधिकारी निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके आहेत. त्यांचे कार्यालय क्षेत्रीय कार्यालय ‘सी’ डालडा फॅक्टरी कंपाऊड, प्रभाग क्रमांक ४, ५, ६ साठी निवडणुक निर्णय अधिकारी अहमदपूर उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे यांचे कार्यालय समाजकल्याण कार्यालय, शिवनेरी गेटसमोर, प्रभाग क्रमांक ७, ८, ९ साठी निवडणुक निर्णय अधिकारी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांचे कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसीलसमोर.   प्रभाग क्रमांक १०, ११, १२ साठी औसाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांचे कार्यालय जूने जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक.  प्रभाग क्रमांक १३, १४, १५ साठी उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांचे कार्यालय क्षेत्रीय कार्यालय ‘अ’ नंदी स्टॉप पाणी टाकी औसा रोड. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ साठी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन संदीप कुलकर्णी यांचे कार्यालय क्षेत्रीय कार्यालय ‘ब’ ठाकरे चौक. त्या त्या प्रभागातील इच्छूक उमेदवारांनी निवडणुक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR