14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeअंतरराष्ट्रीयऋषी सुनक करणार मायक्रोसॉफ्टचा जॉब

ऋषी सुनक करणार मायक्रोसॉफ्टचा जॉब

लंडन : वृत्तसंस्था
ज्यांच्या सास-याची ७ लाख कोटी मूल्य असलेली (इन्फोसिस) आयटी कंपनी आहे, पत्नी अब्जाधीश आणि जे स्वत: ब्रिटनचे माजी पंतप्रधान आहेत. असे असूनही ही व्यक्ती आता मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी करणार आहे. वाचायला जरा विचित्र वाटत असेलही; पण, हे खरं आहे. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांनी आता जागतिक स्तरावरील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये ‘वरिष्ठ सल्लागार’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. यात अमेरिकेची टेक दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीचा स्टार्टअप अँथ्रॉपिक यांचा समावेश आहे.

सुनक यांनी आपल्या ‘लिंक्डइन’वरील पोस्टमध्ये ही माहिती दिली. जुलै २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा त्याग केला होता, मात्र ते अजूनही ब्रिटिश संसदेचे सदस्य आहेत.

माजी पंतप्रधान सुनक यांचा विवाह इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी झाला आहे. अक्षता मूर्ती या अब्जाधीश आहेत. सुनक यांनी लिंक्डइनवर सांगितले की, मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रॉपिकमधून त्यांना मिळणारे वेतन ते आपली पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत सुरू केलेल्या ‘द रिचमंड प्रोजेक्ट’ नावाच्या सेवाभावी संस्थेला दान करतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR