Homeलातूर‘एआयबीईए’च्या ८० व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय क्रिकेट स्पर्धा

‘एआयबीईए’च्या ८० व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय क्रिकेट स्पर्धा

लातूर : प्रतिनिधी
येत्या २० एप्रिल रोजी भारतातील बँक कर्मचा-यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘एआयबीईए’ या संघटनेस ८० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने लातूर येथे विभागीय क्रिकेट  स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
बँक कर्मचारी आज कामाच्या ओझ्याखाली प्रचंड दबलेले असताना त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असणा-या संगीत, क्रीडा, सामाजिक सहल यासारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन संघटनेकडून करण्यात येत असते. ‘अकइएअ@80’ या स्लोगनच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्याची पेरेंट बॉडी असलेल्या महाराष्ट्र स्टेट बँके एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, युथ कौन्सिल समन्वयक दीपक माने, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष कॉ. उत्तम होळीकर, अधिकारी संघटनेचे विवेक पद्रे, सचिन नंदागवळे, राहुल सावंत तसेच लातूर येथील प्रसिद्ध व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते  बालाजी मुस्कावाड, निखिल जोशी उपस्थित होते.
कर्मचा-यांसाठी अशा स्पर्धा आयोजित करण्यामध्ये काही आर्थिक वाटा उचलून बालाजी मुस्कावाड व निखिल जोशी यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत बँक कर्मचा-यांकडे माणूसपणाच्या नजरेतून पाहिलेले आहे. ‘ग्राहक-कर्मचारी’ या नात्याच्या पुढे जाऊन भातृभाव जोपासत या स्पर्धेसाठी त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.  सर्जनशील व विवेकी समाजाच्या निर्माणासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्त असलेली तरुणांची फळी असली पाहिजे यासाठी अशा स्पर्धा नेहमीच आयोजित केल्या पाहीजेत. कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या कर्मचा-यांचा मानसिक ताण कमी व्हावा व ते पुन्हा नव्या जोमाने ग्राहकांच्या सेवेसाठी सिद्ध व्हावेत यासाठी अशा स्पर्धा खूप महत्त्वाच्या असतात.
लातूर, सोलापूर, परभणी, बीड या भागातून बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, या बँकांमधून ‘एआयबीईए’ चे कर्मचारी  स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले होते. ‘बँक ऑफ इंडिया स्ट्रायकर्स’ या संघाने या स्पर्धेचे जेतेपद जिंकले असून ‘महाराष्ट्र ग्रामीण बँक मेवरिक्स’ या संघाने उपविजेतेपद पटकाविले आहे. बँक ऑफ इंडियाचे कॉ. संदेश रोंगे हे उत्कृष्ट फलंदाज तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कॉ .रंजन पांडा हे कर्मचारी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडले गेले. स्पर्धेच्या आयोजनासाठी कॉ.परमेश्वर बडगिरे,कॉ.महेश घोडके, कॉ.उदय मोरे,कॉम्रेड महेश गांधले, कॉ.सदाशिव मुगावे,कॉ.बालाजी खांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR