25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘एआय’ विश्वात रस्सीखेच : ‘शत्रू’च्या मदतीनेच अमेरिकेची शत्रूवर कुरघोडी

‘एआय’ विश्वात रस्सीखेच : ‘शत्रू’च्या मदतीनेच अमेरिकेची शत्रूवर कुरघोडी

महासत्तेसाठी चंग । अमेरिकी कंपन्या चिनी वैज्ञानिकांवर अवलंबून; अंतराळाच्या संदर्भातही चीनचा अमेरिकेशी पंगा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
चीन आणि अमेरिका यांचे संबंध अलीकडच्या काळात बरेच बिघडले आहेत. किंबहुना दोन्ही देश एकमेकांकडे प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहतात. चीनला तर अमेरिकेला मागे टाकून जगातील एकमेव महासत्ता बनायचे आहे. अंतराळाच्या संदर्भातही चीनने अमेरिकेशी पंगा घेतला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) संदर्भातही दोन्ही देशांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करू पाहत आहेत. निदान एआयच्या संदर्भात तरी चीनला आपल्या पुढे जाऊ द्यायचे नाही, असा चंग अमेरिकेनेही बांधला आहे. त्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्यांनी कधीचीच तयारी सुरू केली आहे. मेटाचे सीइओ मार्क झुकेरबर्ग यांनी जूनमध्ये आपल्या नवीन सुपर इंटेलिजन्स लॅबची घोषणा केली होती. तेव्हा त्यांनी सांगितले होते, या प्रोजेक्टमध्ये ११ वैज्ञानिक काम करत आहेत. त्यांचा उद्देश अशी मशीन्स तयार करणे आहे जी मानवी मेंदूपेक्षा जास्त ताकदवान असतील !

या ११ पैकी तब्बल सात वैज्ञानिक चिनी, तर इतर चारपैकी भारत, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक वैज्ञानिक आहे. अमेरिकेत कित्येक सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ चीनला एआय क्षेत्रातील आपला सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी आणि धोका मानतात, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेला ज्यांच्यावर मात करायची त्या चिनी तंत्रज्ञांच्या मदतीनेच ते आपला गाडा पुढे ओढत आहेत. अमेरिकेत चालणारे मोठे आणि क्रांतिकारी एआय संशोधनही चिनी वैज्ञानिकांच्या मदतीनेच सुरू आहे. मेटाच्या एआय युनिटचे प्रमुख चिनचे अलेक्झांडर वॉन्ग आहेत. जून २०२५ मध्ये ते मेटाशी जोडले गेले. त्यांना कंपनीत आणण्यासाठी मार्क झुकेरबर्ग यांनी तब्बल १.२६ लाख कोटी रुपये खर्च केले !

बहुतांश अमेरिकी कंपन्या चिनी वैज्ञानिकांवर अवलंबून आहेत. तिथल्या एआय टीममध्ये चिनी वैज्ञानिकांची संख्या खूप मोठी आहे. यंदा मेटाला जवळपास ६,३०० एच-१बी व्हिसा मंजूर झाले ज्यात चिनी तंत्रज्ञांची संख्या सर्वाधिक आहे. २०२८ पासून मेटाने किमान २८ संशोधने चिनी संस्थांच्या मदतीने तयार केली आहेत.

फक्त मेटाच नाही, तर अ‍ॅपल, गुगल, इंटेल आणि सेल्सफोर्ससारख्या अमेरिकन कंपन्यांनीही चिनी संस्थांसोबत मोठी संशोधने केली आहेत. मायक्रोसॉफ्टने तर सर्वाधिक ९२ महत्वाच्या संशोधनांसाठी भागीदारी केली आहे. ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेने इमिग्रेशन पॉलिसी अतिशय कडक केली. सिलिकॉन व्हॅलीतही चीनविरोधी भावना वाढली. तरीही अमेरिकेत चिनी संशोधक आणि तंत्रज्ञ फक्त टिकूनच नाही राहिले ताहीत तर तिथे ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पॉलसन इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की जगातील टॉप एआय वैज्ञानिकांमधील जवळपास एक-तृतीयांश वैज्ञानिक चीनमधले असून, त्यातील बहुतेक अमेरिकन संस्थांमध्ये काम करत आहेत. अमेरिकन एआय इंडस्ट्रीला आतापर्यंत चिनी टॅलेंटचा सर्वाधिक फायदा झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR