मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ९ जुलै २०२५ रोजी दिल्ली दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दौ-यात त्यांनी भाजपच्या काही बड्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शही, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ही भेट गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात असले तरी अद्याप याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा उच्चस्तरीय भेटीगाठी नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असतात. त्यात सध्या राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.