लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्लास्टिकमुक्त लातूर उप्रकमाचा शुभारंभ व्हावा, या सामाजिक जाणिवेतून ‘एकमत’ने शहरातील विविध संस्था, मान्यवर मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणस्नेही आणि शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या साथीने आज दि. १ सप्टेंबरपासून लातूर शहर व परिसरात माझं लातूर, स्वच्छ लातूर, प्लास्टिकमुक्त लातूर हा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमात सलग दुस-याही दिवशी शहरातील १० गणेश मंडळांना भेटी देऊन प्लास्टिकमुक्त लातूरची शपथ देण्यात आली तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ‘एकमत’च्या या उपक्रमाचे गणेश मंडळांकडून कौतूक होत आहे.
मंगळवारी सकाळी शहरातील १. बाप्पा गणेश मंडळ, जुनी कापड लाईन., उत्साह गणेश मंडळ, जुनी कापड लाईन., नवीन कापड लाईनचा राजा गणेश मंडळ, नवीन कापड गल्ली, अमर गणेश मंडळ, कामदार रोड., लातूर मुद्रक गणेश मंडळ, प्रेस लाईन लोखंडगल्ली, सुवर्ण गणेश मंडळ, सराफ लाईन., श्री गजराज गणेश मंडळ, मलंगगल्ली, जय बजरंग गणेश मंडळ, सम्राट चौक, श्री शिव पार्वती गणेश मंडळ, शाहू चौक. व सम्राट अशोक गणेश मंडळ, मस्जिद रोड, हत्तेनगर या मंडळांचे अध्यक्ष आशिष महिंद्रकर, अजय तापडीया, व्यंकटेश झिपरे, शिवकुमार रुईकर, बसवंतप्पा भरडे, सोेमनाथ लुल्ले, तानाजी घायाळ, सुजित बोकन, रामभाऊ चलवाड, अनिल हुलगुंडे, संतोष ढोबळे व अमर पाटील यांचा ‘एकमत’च्या वतीने संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर, सुपर्ण जगताप, यांच्या हस्ते सत्कार करुन प्रत्येक गणेश मंडळांना ‘एकमत’चा माझं लातूर स्वच्छ लातूर, प्लास्टिमुक्तची शपथ असलेले फ्लेक्स आणि पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
















