26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeनांदेडएकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मुदखेड तालुक्यात खळबळ

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मुदखेड तालुक्यात खळबळ

नांदेड/ मुदखेड : प्रतिनिधी
एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे उघडकीस आली. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे सदर घटना संशयास्पद असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुदखेड तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथील दोन मुलं रेल्वे खाली कटली आहेत. तर त्या मुलाच्या आई-वडिलांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. सदर घटना दिनांक २४ डिसेंबरच्या रात्री घडली असून दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आले आहे. परंतु हे सर्व संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

मयत मुलाचे नाव उमेश लखे २५ व दुस-याचे बजरंग लखे वय २२ असे आहे तर
वडील रमेश लखे वय ५१ व आईचे नाव राधाबाई रमेश लखे वय ४५असे असल्याचे माहिती समजते. या घटनेची माहिती मिळताच भोकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सदर घटना ही आत्महत्या प्रकारातली आहे की खातपात आहे याबाबत तर्क वितर्क सुरू असून पोलीस गतीने या घटनेचा तपास करीत आहेत या तपासातच नेमकी सत्य घटना काय आहे हे पुढे येणार आहे या घटनेमुळे मुदखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR