‘एचएसआरपी’ नंबर प्लेटसाठी पुन्हा मुदतवाढ

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक वाहनावर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’असणे बंधनकारक असून, जुन्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी वाहनधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर एचएसआरपी नंबर प्लेट न लावलेल्या वाहनांवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे.

परिवहन विभागाच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की, गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या किंवा बनावट नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना मोठी डोकेदुखी ठरते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट असण्याचा निर्णय परिवहन भागाने घेतला आहे.
राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे १ कोटी वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. उर्वरित ४४ ते ४५ टक्के जुन्या वाहनधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

नियमातून कोणालाही सूट नाही
प्रताप सरनाईक यांनी लोकप्रतिनिधींनाही नियमांची स्पष्ट जाणीव करून दिली आहे. या नियमातून कोणालाही सूट दिली जाणार नाही. मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असोत, सर्वांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक आहे. ३१ डिसेंबरनंतर ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही नियमांनुसार समान कारवाई करण्यात येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ
पहिली मुदतवाढ : ३० एप्रिल २०२५
दुसरी मुदतवाढ : १५ ऑगस्ट २०२५
तिसरी मुदतवाढ : ३० नोव्हेंबर २०२५
आता ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली असली, तरी अजूनही नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. या सर्व वाहनांवर एकाच वेळी कारवाई करणे प्रशासनाला शक्य होईल का, आणि नागरिकांचा संभाव्य रोष पाहता सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देणार का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news