एटीएममध्ये देशभरात कॅशचा तुटवडा!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात एटीएममध्ये रोख रक्कम अर्थात कॅशचा प्रचंड तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. देशात अनेक भागांत असलेल्या एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. एटीएममध्ये जमा करण्यासाठी बँकांकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने हे संकट ओढवले आहे. याची गंभीर दखल घेत एटीएम क्षेत्रातील शिखर संस्था पॅटमीने चिंता व्यक्त करत इंडियन बँक असोसिएशनला (आयबीए) पत्र लिहून तात्काळ मदत करा, अशी विनंती केली आहे. दरम्यान, अनेकदा एटीएम मशिन चालत नाहीत आणि जिथे कॅश भरण्यासाठी मशिन बसविल्या आहेत, त्या पण धड चालत नाहीत. त्यामुळे अनेकदा ग्राहकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

ग्राहकांसाठी लागणारी रोकड आणि बँकांकडून प्रत्यक्षात मिळणारा पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात ९४ हजार कोटी रुपयांची गरज असताना बँकांकडून केवळ ६१ हजार कोटी रुपये म्हणजेच केवळ ६४ टक्के रक्कम मिळाली. एप्रिल महिन्यातसुद्धा अशीच परिस्थिती होती. ९४ हजार कोटी रुपयांऐवजी केवळ ५४ हजार कोटी रुपये म्हणजेच केवळ ५७ टक्के रक्कम एटीएममध्ये जमा करण्यात आली होती. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीची रीतसर माहिती आरबीआयच्या चलन व्यवस्थापन विभागालाही देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात दखल घेऊन बँकांना आवश्यक तेवढा कॅश उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अनेक बँकांना एटीएमचा खर्च परवडेनासा झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने कॅश व्हॅनद्वारे एटीएमपर्यंत पैसे पोहोचवण्याचा खर्च वाढला आहे. एटीएम सुरक्षा रक्षक आणि कर्मचा-यांच्या पगाराचा बोजा वाढला आहे. ऑपरेशनलचा खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी ठरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एटीएम केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. ब-याचदा तर तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होताना दिसत आहे.

५ राज्यांत एटीएम
सेवा विस्कळीत
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या ५ राज्यांत एटीएम सेवा विस्कळीत झाली आहे. कर्नाटकात केवळ रोख रक्कम ३६ टक्के उपलब्ध आहे. आंध्र प्रदेशात ३९ टक्के, तेलंगणात ४१ टक्के, मिझोराममध्ये ४१ टक्के, अरुणाचल प्रदेशात ४८ टक्के रोख रक्कम एटीएममध्ये उपलब्ध आहे.

वाढत्या शुल्कामुळे
ग्राहकांची पाठ
एटीएम वापरण्याच्या शुल्कात वाढ झाली आहे. २१ रुपयांवरून २३ रुपये झाले आहे. गेल्या वर्षी ४९.८४ कोटी एटीएममधून काढण्यात आले होते. एकूण व्यवहारांचे मूल्यही २.६४ लाख कोटींवरून २.५ लाख कोटी रुपयांवर आले आहे. वाढत्या शुल्कामुळे ग्राहकांनी एटीएमकडे पाठ फिरवली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news