26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रएबी फॉर्मची पळवापळवी

एबी फॉर्मची पळवापळवी

नाशिकमध्ये भाजपात राडा; ३ आमदारांच्या गाडींचा जिल्हाध्यक्षांकडून पाठलाग

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. एबी फॉर्म वाटपावरून नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये राडा झाला असून एबी फॉर्मची पळवापळवी सुरू आहे. भाजपचे तिन्ही आमदार एकाच गाडीत एबी फॉर्म घेऊन गेले. त्यामुळे भाजप आमदारांच्या गाडीचा नाशिक-मुंबई महामार्गावर जिल्हाध्यक्षांनी पाठलाग केला. याचा व्हीडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे, नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. नाशिकच्या पंचवटी विभागीय कार्यालयाबाहेर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांनी गोंधळ घातला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवारांची पळापळ होत आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांनी घेरले. सुनील केदार यांची गाडी अडवण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR