‘एमपीएससी’ औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘ती’ तक्रारच बनावट?

मुंबई : देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप झाले होते. मात्र, आता या प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेत पेपरफुटी झाल्याची तक्रार करणा-या व्यक्तीनेच ‘ती’ तक्रार बनावट असल्याचा दावा ई-मेलद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

२२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक भरतीची लेखी परीक्षा पार पडली. त्यानंतर १२ जून रोजी निकाल जाहीर झाला. १ ते २१ जुलै या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर २३ जुलै रोजी एमपीएससीला ई-मेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीत परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला होता. काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा तसेच गुणपत्रिका आणि अंतिम निवडीत विसंगती असल्याचाही दावा करण्यात आला होता.

तक्रार प्राप्त होताच एमपीएससीने तक्रारदाराला सर्व उपलब्ध पुरावे सादर करण्यास सांगितले. तसेच संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. आज या सर्वांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या जबाबांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाला काल रात्री मोठे वळण मिळाले. तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ई-मेल पाठवत, पूर्वी केलेली तक्रार बनावट होती, असा दावा केल्याची माहिती एमपीएससीतील सूत्रांनी दिली आहे. या ई-मेलमध्ये पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचला, असे त्यात म्हटले आहे. २० मार्च रोजी कथित संभाषण झालेल्या घटनेची तक्रार २४ जुलैपर्यंत इतक्या विलंबाने का झाली, याचाही तपास केला जात आहे.

आधी झाले होते गंभीर आरोप
यापूर्वी तक्रारदारांनी एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार करून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप केला होता. तसेच व्हॉट्सअ‍ॅप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे यांची फॉरेन्सिक तपासणी करून संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचा दावा केल्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून भरती प्रक्रियेवर परिणाम होणार का, याकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news