मुंबई : वृत्तसंस्था
दुबईची दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी बँक एमिरेट्स एनबीडी ही भारतातील आरबीएल ही बँक विकत घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये गुंतविणार असून याद्वारे आरबीएलचे ५१ टक्के समभाग विकत घेणार आहे. ही डील झाल्यास बँकिंग क्षेत्रातील अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे. सध्या ‘आरबीएल’ बँकेचे बाजार भांडवल सुमारे रु. १७,७८६ कोटी आहे.
‘आरबीएल’ बँकेची बोर्ड मीटिंग १८ ऑक्टोबरला होणार असून, त्यात या तिमाहीच्या निकालांवर चर्चा केली जाईल. या भेटीतच या गुंतवणुकीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या गुंतवणुकीसाठी आणि बँकेच्या व्यवस्थापनामध्ये बदलासाठी तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
भारतीय स्थलांतरितांपैकी जवळपास अर्धे लोक आखाती देशांमध्ये राहतात, त्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. ही गुंतवणूक मुख्यत: प्रेफरेंशियल अलॉटमेंटद्वारे केली जाईल, ज्यात शेअर्स आणि वॉरंटचा समावेश असेल. यानंतर, अतिरिक्त २६% शेअर्ससाठी ओपन ऑफर आणली जाईल, ज्यामुळे एमिरेट्स एनबीडीचा एकूण हिस्सा ५१% पर्यंत वाढेल.

